कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड-1 येथे ‘वंदे मातरम्’ या गीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने “वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या निमित्ताने दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कृषि विज्ञान केंद्राच्या सभागृहात ‘वंदे मातरम्’ या गीताचे सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी च्या डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताचा इतिहास आणि त्यामागील राष्ट्रभावना प्रभावीपणे मांडली. यानंतर कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी चे शास्त्रज्ञ प्रा. माणिक कल्याणकर, डॉ. महेश अंभोरे, प्रा. संदीप जायेभाये, सौं. अलका पवळे व इतर कर्मचारी, श्री. राजीव इंगोले,श्री. अशोक भालेराव,सौं. प्राजक्ता हाडोळतिकर, श्री. राहुल राऊत व बायोटेक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून ‘वंदे मातरम्’ या गीताचे अतिशय सुरेल पद्धतीने सामूहिक गायन केले. या कार्यक्रम ला श्री. राकेश वाडीले यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, एकात्मता आणि सांस्कृतिक अभिमानाची भावना जागृत करणे तसेच ‘वंदे मातरम्’ या गीतातील प्रेरणादायी संदेश सर्वांपर्यंत पोहोचविणे हा आहे.



No comments:
Post a Comment