केळी चिप्स प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


    कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णी, नांदेड-१ च्या अंतर्गत व डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) कृ. वि. के. पोखर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय केळी चिप्स प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.  या प्रशिक्षणाचे आयोजन प्रा.अल्का पवळे (गृह विज्ञान तज्ञ)  यांनी केले तर या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉ. अमिता क्षत्रिय  (कृषि विस्तार तज्ञ ) यांनी केले केळी चिप्स प्रशिक्षण दोन सत्रात आयोजित करण्यात आले असून पहिल्या सत्रामध्ये सादरीकरणातून प्रा.अलका पवळे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना, केळी प्रक्रिया अनुदान, परवाने, प्रात्यक्षिक, भांडवल, पॅकेजिंग, लेबलिंग, मार्केटिंग व यंत्रसामग्री याबद्दल महिला बचत गट, शेतकरी गट,युवक व युवती यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या ॲड.अपर्णा सावळे  यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्केटिंग व पॅकेजिंग बद्दल सखोल अशी माहिती दिली. यानंतर डॉ. अमिता क्षत्रिय  (कृषि विस्तार तज्ञ ) यांनी प्रसार व सामाजिक माध्यमाचा वापर करून केळी चिप्स चे विपणन व जाहिरात कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ), डॉ. महेश आंबोरे (पशुवैद्यक तज्ञ), प्रा. संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांची विशेष उपस्थिती लाभली.

    दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. अलका पवळे (गृह विज्ञान तज्ञ) यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून कच्च्या केळीपासून चिप्स कसे बनवावे याची सविस्तर प्रक्रिया सांगितली व पाच ते सहा प्रकारच्या फ्लेवर्स ची केळी वेफर्स बनवून दाखवण्यात आले प्रशिक्षणार्थीनीं ती करून पाहिली. त्यानंतर "केळी वेफर्स"चे मूल्यांकन देखील उपस्थित शास्त्रज्ञ व प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून करण्यात आले होते.

 या प्रशिक्षणामध्ये एकूण २०  प्रशिक्षणार्थीनीं सहभाग घेतला होता.

या प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी श्री ए.जी भालेराव,श्री आर.आर इंगोले,श्री आर.टी. वाडीले,श्री.एस. एस. जाधव, सौ पी. एस. हाडोळतिकर, श्री एस.एस. गायकवाड, श्री एस.आर.कोणापुरे,श्री आर.जी.राऊत आणि संतोष वाघमारे यांचे देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष सहकार्य लाभले.



No comments:

Post a Comment