कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड-१ येथे पी एम किसान सम्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण

        

        दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी, कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड-१ येथे पी एम किसान सम्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. एस.डी मोरे संचालक कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी तसेच विशेष उपस्थिती व प्रमुख पाहुणे म्हणून आ.मा.श्री बालाजी कल्याणकर विधानसभा सदस्य नांदेड उत्तर यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.देविकांत देशमुख व प्रा. माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉ. अमिता क्षत्रिय ( कृषी विस्तार तज्ञ) यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय कृषी अनुसंधान परिषद गीताने झाली त्यानंतर बळीराजा व भारताच्या पहिल्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक प्रा. माणिक कल्याणकर पीक संरक्षण तज्ञ यांनी सादर केले यात त्यांनी पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना २०१९ पासून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे त्या अंतर्गत 21 व्या हप्त्याचे  शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कमेचे वितरण करण्यात येत आहे, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सर्व महिला शेतकरी उपस्थित आहेत त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र च्या वतीने अनेक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. 

मा.आ.श्री.बालाजी कल्याणकर यांनी उपस्थित महिलांना  शेतीमालाचा घसरता बाजारभाव लक्षात घेता त्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया उद्योग उभारण्याचे आवाहन  केले.शेतीपूरक व्यवसाय करून आर्थिक मदत मिळू शकते आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडनार नाही. तसेच रसायनमुक्त भाजीपाला खावा जेणेकरून शरीरावर दुष्परिणाम होणार नाही आणि खर्चात पण बचत होईल असे देखील त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. एस. डी. मोरे संचालक,कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमासाठी जवळपास ८० महिला शेतक-यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. महेश आंबोरे ( पशुवैद्यक तज्ञ), यांनी केले व सौं. अलका पवळे (गृह विज्ञान तज्ञ) यांचे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाला श्री. राहुल शिंदे, व्यवस्थापक (माविम) सौं.प्रभावती लोकेवार तालुका अध्यक्ष (माविम) तसेच कृषि सखी सौं. शितल पिंपळपल्ले व सौं.शिल्पा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

    या कार्यकमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी श्री ए.जी भालेराव,श्री आर आर इंगोले,श्री आर.टी. वाडीले,श्री एस. एस. जाधव, सौ पी. एस. हाडोळतिकर, श्री एस.एस. गायकवाड, श्री एस.आर.कोणापुरे,श्री आर.जी.राऊत आणि संतोष वाघमारे यांचे देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष सहकार्य लाभले.











No comments:

Post a Comment