शेती दिन - समूह आद्य रेषीय पीक प्रात्यक्षिक - तृणधान्य रब्बी ज्वारी -परभणी शक्ती (Biofortified)


        मौजे.भिसी ता. किनवट या आदिवासी गावामध्ये कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड-1 च्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली आटारी झोन पुणे च्या  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियाना अंतर्गत तृणधान्य  रब्बी ज्वारी  -परभणी शक्ती या वाणा बद्दल समूह आद्य रेषीय पीक प्रात्यक्षिक व शेती दिन साजरा करण्यात आला. या वेळी 25 लाभार्थी शेतकरी बंधू व भागिनींना या भारतातील पहिल्या बियोफोर्टिफाइड (Biofortified )वाणाचे वाटप करण्यात आले. यावेळी  प्रा. माणिक कल्याणकर (पिक संरक्षण तज्ञ यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली ज्यात त्यांनी या वाणा मध्ये नियमित ज्वारीपेक्षा अंदाजे ५०% जास्त लोह आणि जस्त असते व प्रथिने जास्त आणि फायटेटचे प्रमाण कमी असते याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.  ( प्रा. संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांनी ज्वार लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली व डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी  विविध  प्रसार व सामाजिक माध्यम व त्याचा शेतीमध्ये करावयाचा योग्य वापर या विषयी माहिती दिली

        या कार्यक्रम साठी कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी चे श्री. मारोती सूर्यवंशी, श्री. संतोष वाघमारे व गावच्या कृषि सखी, CRP, सहाय्यक कृषि अधिकारी,प्रगतशील शेतकरी, व उपस्थित शेतकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.






No comments:

Post a Comment