दिनांक 31 ऑक्टोबर, 2025 रोजी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू मा.डॉ. इंद्रामणी सर यांच्या प्रेरणेतून व संचालक, कृषि विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांच्या अधिपत्याखाली व कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड-1 यांच्या च्या समन्वयातून शेतकरी - शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद उपक्रम हा आमचे शेतकरी, आमचा गौरव या सदरखाली "शेतकऱ्यांच्या यशोगाथा" या विषयावर 70 वा भाग आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉ.अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) कृ. वि. के पोखर्णी यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र,पोखर्णी, नांदेड-1 चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख ( उद्यानविद्या तज्ञ),यांनी कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड -1 च्या माध्यमातून नांदेड जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्र च्या विविध प्रशिक्षणे, कृषी सल्ला व मार्गदर्शन थेट बांधावरच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीचे मान्यवरापुढे प्रास्ताविक केले, मा. डॉ. राकेश अहिरे संचालक, कृषि विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी आमचे शेतकरी, आमचा गौरव या सदरखाली "शेतकऱ्यांच्या यशोगाथा" हा जो विषय निवडण्यात आला, तो खरोखरच अभिमानास्पद आहे आणि कृषि विज्ञान केंद्र ची टीम हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडत आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. व.ना. म. कृ. वि परभणी चे, किटकशास्त्र विभाग प्रमुख, यांनी शेतकऱ्याना समर्प्रित या विशेष सवांद कार्यक्रमाचे कौतुक करुन के. वि. के. पोखर्णी च्या विविध उपक्रमाचे समाधान व्यक्त केले. के.वि.के पोखर्णी च्या नावीन्य पूर्ण माहितीचे व विविध उपक्रमाचे शेतकऱ्यानी कौतुक केले.
त्यानंतर "शेतकऱ्यांच्या यशोगाथा" या विषयावर नांदेड जिल्ह्यातील जवळपास 14 शेतकऱ्यांनी ते करत असलेले विविध शेतीउदयोग व शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या मध्ये श्री.नंदप्रसाद जाधव - रेशीम बाल किटक संगोपन,सौं.सुनीता कावळे- आवळा प्रक्रिया उद्योग श्री.बालाजी महादावड - चिया पिक, श्री. अविनाश मुंगल- दुग्ध व्यवसाय व फुलशेती, श्री. हनुमंत फाटेकर -मशरूम उत्पादन,श्री. विश्वभर कदम - एकात्मिक शेती, सौं अर्चना माने - ड्रॅगन व मसाला शेती, श्री सुनील शिंदे -
श्री. राम मुंडे - सेंद्रिय आंबा व प्रक्रिया उद्योग,श्री. रवी कावलगावे - शेळीपालन, श्री. श्याम कदम -श्री. गुलाबराव पावडे - मोरिंगा पावडर व मार्केटिंग
श्री. बालाजी उपवार - स्ट्राबेरी लागवड,श्री. कबिरदास कदम - दूध उत्पादन व प्रक्रिया उद्योग, श्री. गणेश बुरकूल - मधू भक्षिका पालन यांचा समावेश होता. या ऑनलाईन शेतकरी -शास्त्रज्ञ संवादामध्ये 122 शेतकऱ्यांचा सहभाग होता,तसेच कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी चे प्रा. माणिक कल्याणकर (पिक संरक्षण तज्ञ)
डॉ. महेश अंबोरे ( पशुवैद्यक तज्ञ), प्रा. संदीप जायेभाये ( कृषि विद्या तज्ञ ) व सौं. अल्का पवळे ( ग्रह विज्ञान तज्ञ) यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी श्री. राकेश वाडीले कृ. वि. के. पोखर्णी यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी केले.


No comments:
Post a Comment