राष्ट्रीय दुग्ध दिवस जिल्हा परिषद शाळा, कोल्हारी ता.किनवट जि. नांदेड येथे साजरा करण्यात आला. .मौजे. कोल्हारी या आदिवासीबहुल गावात सदरील दिवसाचे आयोजन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, यावेळी डॉ. महेश अंबोरे (पशु वैद्यक तज्ञ) यांनी दुग्ध दिवस का साजरा करतो आणि या दिवसाचे महत्व तसेच दुधाचे आहारातील महत्व सांगितले. तर वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांनी दैनंदिन दिनचर्या कशी असावी यावर मार्गदर्शन केले. तर प्रा. संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांनी उधिष्ट कसे साध्य करता येईल व आपल्यातील क्षमतेचा योग्य ठिकाणी कसा वापर करायचा या विषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी शालवचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
शेती दिन (Field day) - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व समूह आद्यरेषा पीक प्रात्यक्षिक (CFLD Pulses)
मौजे. इस्लापूर, इरेगांव, नांदगाव, कुपटी, पांगरी, शिवणी, जलधारा, कोल्हारी ता.किनवट येथे कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी च्या वतीने व डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख ) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व सामूहिक आद्यरेषा पीक प्रात्यक्षिक अंतर्गत बीडीएन -716 या वाणासाठी मार्गदर्शन, शेतकरी -शास्त्रज्ञ संवाद, गटचर्चा, शेतकऱ्यांचे अभिप्राय तसेच शेतकऱ्यांना कीटकनाशक,बुरशीनाशक, सूक्ष्म पोषक घटक, ट्रायकोडर्मा वाटप करण्यात आले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णी चे डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख ) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, प्रशिक्षणा विषयी माहिती दिली, यानंतर प्रा.माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ ) यावेळी कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णी चे प्रा.माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ ) यांनी तूर पिकातील किड व रोग व्यवस्थापन तसेच जैविक निविष्ठा चा योग्य वापर याबद्दल शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.
प्रा.संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या योजनेबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच तुर पिका खालील क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच तुर पिकातील अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले.
यानंतर डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी शेतकऱ्यांना विविध कृषि योजना, शेतीमध्ये प्रसार व सामाजिक माध्यम व विविध शेती विषयक मोबाईल ॲप व त्याचा योग्य वापर याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. महेश अंबोरे (पशु वैद्यक तज्ञ) यांनी हिवाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी व त्यांच्या मिळणारे शेणखताचा योग्य वापर याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी मौजे. इस्लापूर, इरेगांव, नांदगाव, कुपटी, पांगरी शिवणी, जलधारा, कोल्हारी या गावातील मिळून २०५ शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रम साठी कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी चे श्री. मारोती सूर्यवंशी, श्री. संतोष वाघमारे व गावच्या कृषि सखी, CRP, सहाय्यक कृषि अधिकारी,प्रगतशील शेतकरी, व उपस्थित शेतकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शेती दिन - समूह आद्य रेषीय पीक प्रात्यक्षिक - तृणधान्य रब्बी ज्वारी -परभणी शक्ती (Biofortified)
मौजे.भिसी ता. किनवट या आदिवासी गावामध्ये कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड-1 च्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली आटारी झोन पुणे च्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियाना अंतर्गत तृणधान्य रब्बी ज्वारी -परभणी शक्ती या वाणा बद्दल समूह आद्य रेषीय पीक प्रात्यक्षिक व शेती दिन साजरा करण्यात आला. या वेळी 25 लाभार्थी शेतकरी बंधू व भागिनींना या भारतातील पहिल्या बियोफोर्टिफाइड (Biofortified )वाणाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. माणिक कल्याणकर (पिक संरक्षण तज्ञ यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली ज्यात त्यांनी या वाणा मध्ये नियमित ज्वारीपेक्षा अंदाजे ५०% जास्त लोह आणि जस्त असते व प्रथिने जास्त आणि फायटेटचे प्रमाण कमी असते याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. ( प्रा. संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांनी ज्वार लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली व डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी विविध प्रसार व सामाजिक माध्यम व त्याचा शेतीमध्ये करावयाचा योग्य वापर या विषयी माहिती दिली
या कार्यक्रम साठी कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी चे श्री. मारोती सूर्यवंशी, श्री. संतोष वाघमारे व गावच्या कृषि सखी, CRP, सहाय्यक कृषि अधिकारी,प्रगतशील शेतकरी, व उपस्थित शेतकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व सामूहिक आद्यरेषा पीक प्रात्यक्षिक अंतर्गत शेती दिन (Field day- CFLD Pulses)
मौजे.पळसपूर ता.हिमायतनगर येथे कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी च्या वतीने व डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख ) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व सामूहिक आद्यरेषा पीक प्रात्यक्षिक अंतर्गत बीडीएन -716 या वाणासाठी मार्गदर्शन, शेतकरी -शास्त्रज्ञ संवाद, गटचर्चा, शेतकऱ्यांचे अभिप्राय तसेच शेतकऱ्यांना कीटकनाशक,बुरशीनाशक, सूक्ष्म पोषक घटक, ट्रायकोडर्मा वाटप करण्यात आले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णी चे प्रा.माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ ) यांनी तूर पिकातील किड व रोग व्यवस्थापन तसेच जैविक निविष्ठा चा योग्य वापर याबद्दल शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले
प्रा.संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या योजनेबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच तुर पिका खालील क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच तुर पिकातील अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले.
यानंतर डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी शेतकऱ्यांना विविध कृषि योजना, शेतीमध्ये प्रसार व सामाजिक माध्यम व विविध शेती विषयक मोबाईल ॲप व त्याचा योग्य वापर याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जवळपास 30 शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रम साठी कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी चे श्री. मारोती सूर्यवंशी, श्री. संतोष वाघमारे व गावच्या कृषि सखी,CRP, सहाय्यक कृषि अधिकारी, प्रगतशील शेतकरी, व उपस्थित शेतकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व समूह आद्यरेषा पीक प्रात्यक्षिक (CFLD Pulses-Pigeon Pea) अंतर्गत शेती दिन संपन्न
मौजे.हडसनी ता.माहूर येथे कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी च्या वतीने व डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख ) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व समूह आद्यरेषा पीक प्रात्यक्षिक अंतर्गत बीडीएन -716 या वाणासाठी मार्गदर्शन, शेतकरी -शास्त्रज्ञ संवाद, गटचर्चा, शेतकऱ्यांचे अभिप्राय तसेच शेतकऱ्यांना कीटकनाशक,बुरशीनाशक, सूक्ष्म पोषक घटक, ट्रायकोडर्मा वाटप करण्यात आले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णी चे प्रा.माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ ) यावेळी कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णी चे प्रा.माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ ) यांनी तूर पिकातील किड व रोग व्यवस्थापन तसेच जैविक निविष्ठा चा योग्य वापर याबद्दल शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले
प्रा.संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या योजनेबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच तुर पिका खालील क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच तुर पिकातील अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले.
यानंतर डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी शेतकऱ्यांना विविध कृषि योजना, शेतीमध्ये प्रसार व सामाजिक माध्यम व विविध शेती विषयक मोबाईल ॲप व त्याचा योग्य वापर याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जवळपास 50 शेतकरी उपस्थित होते
या कार्यक्रम साठी कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी चे श्री. मारोती सूर्यवंशी, श्री. संतोष वाघमारे व गावच्या कृषि सखी,CRP, सहाय्यक कृषि अधिकारी, प्रगतशील शेतकरी, व उपस्थित शेतकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड-१ येथे पी एम किसान सम्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण
दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी, कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड-१ येथे पी एम किसान सम्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. एस.डी मोरे संचालक कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी तसेच विशेष उपस्थिती व प्रमुख पाहुणे म्हणून आ.मा.श्री बालाजी कल्याणकर विधानसभा सदस्य नांदेड उत्तर यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.देविकांत देशमुख व प्रा. माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉ. अमिता क्षत्रिय ( कृषी विस्तार तज्ञ) यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय कृषी अनुसंधान परिषद गीताने झाली त्यानंतर बळीराजा व भारताच्या पहिल्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. माणिक कल्याणकर पीक संरक्षण तज्ञ यांनी सादर केले यात त्यांनी पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना २०१९ पासून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे त्या अंतर्गत 21 व्या हप्त्याचे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कमेचे वितरण करण्यात येत आहे, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सर्व महिला शेतकरी उपस्थित आहेत त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र च्या वतीने अनेक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
मा.आ.श्री.बालाजी कल्याणकर यांनी उपस्थित महिलांना शेतीमालाचा घसरता बाजारभाव लक्षात घेता त्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया उद्योग उभारण्याचे आवाहन केले.शेतीपूरक व्यवसाय करून आर्थिक मदत मिळू शकते आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडनार नाही. तसेच रसायनमुक्त भाजीपाला खावा जेणेकरून शरीरावर दुष्परिणाम होणार नाही आणि खर्चात पण बचत होईल असे देखील त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. एस. डी. मोरे संचालक,कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमासाठी जवळपास ८० महिला शेतक-यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. महेश आंबोरे ( पशुवैद्यक तज्ञ), यांनी केले व सौं. अलका पवळे (गृह विज्ञान तज्ञ) यांचे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला श्री. राहुल शिंदे, व्यवस्थापक (माविम) सौं.प्रभावती लोकेवार तालुका अध्यक्ष (माविम) तसेच कृषि सखी सौं. शितल पिंपळपल्ले व सौं.शिल्पा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यकमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी श्री ए.जी भालेराव,श्री आर आर इंगोले,श्री आर.टी. वाडीले,श्री एस. एस. जाधव, सौ पी. एस. हाडोळतिकर, श्री एस.एस. गायकवाड, श्री एस.आर.कोणापुरे,श्री आर.जी.राऊत आणि संतोष वाघमारे यांचे देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष सहकार्य लाभले.
केळी चिप्स प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णी, नांदेड-१ च्या अंतर्गत व डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) कृ. वि. के. पोखर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय केळी चिप्स प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे आयोजन प्रा.अल्का पवळे (गृह विज्ञान तज्ञ) यांनी केले तर या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ ) यांनी केले केळी चिप्स प्रशिक्षण दोन सत्रात आयोजित करण्यात आले असून पहिल्या सत्रामध्ये सादरीकरणातून प्रा.अलका पवळे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना, केळी प्रक्रिया अनुदान, परवाने, प्रात्यक्षिक, भांडवल, पॅकेजिंग, लेबलिंग, मार्केटिंग व यंत्रसामग्री याबद्दल महिला बचत गट, शेतकरी गट,युवक व युवती यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या ॲड.अपर्णा सावळे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्केटिंग व पॅकेजिंग बद्दल सखोल अशी माहिती दिली. यानंतर डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ ) यांनी प्रसार व सामाजिक माध्यमाचा वापर करून केळी चिप्स चे विपणन व जाहिरात कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ), डॉ. महेश आंबोरे (पशुवैद्यक तज्ञ), प्रा. संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांची विशेष उपस्थिती लाभली.
दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. अलका पवळे (गृह विज्ञान तज्ञ) यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून कच्च्या केळीपासून चिप्स कसे बनवावे याची सविस्तर प्रक्रिया सांगितली व पाच ते सहा प्रकारच्या फ्लेवर्स ची केळी वेफर्स बनवून दाखवण्यात आले प्रशिक्षणार्थीनीं ती करून पाहिली. त्यानंतर "केळी वेफर्स"चे मूल्यांकन देखील उपस्थित शास्त्रज्ञ व प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये एकूण २० प्रशिक्षणार्थीनीं सहभाग घेतला होता.
या प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी श्री ए.जी भालेराव,श्री आर.आर इंगोले,श्री आर.टी. वाडीले,श्री.एस. एस. जाधव, सौ पी. एस. हाडोळतिकर, श्री एस.एस. गायकवाड, श्री एस.आर.कोणापुरे,श्री आर.जी.राऊत आणि संतोष वाघमारे यांचे देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष सहकार्य लाभले.
मशरूम (आळिंबी) लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण
कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी नांदेड -1 येथे माविम (महिला आर्थिक विकास महामंडळ) यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी यांच्या मार्गदर्शनाने पिक संरक्षण तज्ञ प्रा.माणिक कल्याणकर यांनी आयोजित केलेले मशरूम(आळंबी) उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमिता क्षत्रिय ( कृषि विस्तार तज्ञ) कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मुख्य मार्गदर्शन प्रा.माणिक कल्याणकर ( पिक संरक्षण तज्ञ) कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी यांनी कमी भांडवल, कमी जागा व पुरेशा संसाधनाचा वापर करून महिलांना मातीविरहित शेती पूरक व्यवसाय म्हणून मशरूम उत्पादन हा एक उत्पन्नाचा चांगला पर्याय असून आपल्या भागात मशरूम लागवड चांगल्या पद्धतीने करता येते आणि मशरूम ची लागवड करताना घ्यावयाची काळजी, लागवड करण्याची पद्दत, बि निवड, हार्वेस्टिंग पद्धत, खाण्यायोग्य सुरक्षित मशरूम ची उत्पादन करणे या बाबत प्रात्यक्षिकांसह उपस्थित प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.
प्रा. सौं.अलका पवळे (गृह विज्ञान तज्ञ ) यांनी मशरूम आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवते,त्वचा आणि केसांसाठी चांगले असते,पचन सुधारते,व्हिटॅमिन डीचा वनस्पती-आधारित स्रोत, मधुमेह नियंत्रित करण्यास मदत: मशरूम रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. वजन कमी करण्यास मदत करते अश्या प्रकारे मशरूमचे आहारातील व आरोग्यातील महत्व यावर उपस्थित प्रशिक्षणार्थीना माहिती दिली. यावेळी पशुवैद्यक तज्ञ डॉ. महेश अंबोरे यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अशोक भालेराव, श्री राजीव इंगोले ,सौ प्राजक्ता हाडोळीकर, श्री शिवाजी जाधव ,श्री शंकर कोणापुरे ,श्री राहुल राऊत इत्यादींनी सहकार्य केले.
कार्यक्रम करता महिला आर्थिक विकास महामंडळ चे नांदेड चे व्यवस्थापक श्री राहूल शिंदे यांनी समन्वय व व्यवस्थापण केले.
या प्रसंगी प्रभावती लोकेवार, शशिकला जाधव, रमा वैद्य, संभाजी मैठे, कल्याण गुब्रे निळा नाळेश्वर भागतील बचत गटातील 45 महिला व शेतकरी उपस्थित होते.
वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव

.jpeg)
.jpeg)

.jpeg)




.jpeg)




.jpeg)



.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)




.jpeg)
.jpeg)














