पसिदी पेंटा फाउंडेशन CSR -Nestle, RSP (Responsible Sourcing Program ) च्या अंतर्गत लोहा तालुक्यातील पोखरभोसी, धानोरा, पिंपळगांव, धावरी या गावातील शेतकऱ्यांसाठी, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी, नांदेड -1 येथे नेसर्गिक व सेंद्रिय शेती प्रशिक्षण आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) के. वि. के पोखर्णी यांनी केले.
या प्रशिक्षणा मध्ये डॉ. देवीकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी यांनी सेंद्रिय शेती म्हणजे काय व आज सेंद्रिय व नैसर्गिक शेती जर करायची असेल तर शेतकऱ्यांनी संयम ठेवणे व जुना शेतीचा वारसा हा पुढे चालवणे खूप आवश्यक आहे. यानंतर प्रा.संदीप जायभाये यांनी जमिनीची सुपीकता जैवविविधता,नैसर्गिक व सेंद्रिय शेती सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, यानंतर प्रा.माणिक कल्याणकर (पिक संरक्षण तज्ञ) के. वि. के. पोखर्णी यांनी हळद व कापूस पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच कीड व रोग नियंत्रण तंत्र तंत्रज्ञान, सेंद्रिय निविष्ठाचा वापर व योग्य नियोजन, बीज प्रक्रिया, जैविक बुरशीनाशकाचा वापर याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यानंतर डॉ.महेश अंबोरे (पशुवैद्यक तज्ञ) के. वि. के. पोखर्णी यांनी नैसर्गिक शेती मध्ये पशुधनाचे काय महत्व आहे तसेच शेती व पशुधन एकमेकांवर कसे अवलंबून आहेत व शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध विक्री व्यवसाय करणे आवश्यक आहे तसेच लंपी स्किन डिसीज व गोचीड यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन कडुलिंब तेल, करंज तेल व निलगिरी तेल 15 ml आणि 15 ग्रॅम साबुन 1 लिटर पाण्यात मिसळून 6 तासानी ते फवारणी करावे. या सोबतच कडुलिंब पानाची धुरी / धूर सकाळ संध्याकाळ गोठ्यात करावा असे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, यानंतर सौं.अलका पवळे (गृहविज्ञान तज्ञ) के.वि. के पोखर्णी यांनी परसबाग व आवळा,केळी, हळद व डाळ प्रक्रिया उद्योग, शिवणकाम व भरतकम याविषयीची प्रशिक्षण के.वि. के. पोखर्णी येथे आयोजित केले जाते तरी सर्व शेतकरी बंधू व भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान केले. डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ ) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रसार व सामाजिक माध्यम तसेच AI (कृत्रिम बुद्धिमता) विषयी योग्य ज्ञान संपादन करून त्याचा शेतीमध्ये कसा वापर केला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. पसिदी पेंटा फाउंडेशन चे प्रोजेक्ट मॅनेजर अमित येंढे, प्रगतशील शेतकरी मारोती डांगे, परसराम भुजबळ, नितीन ढगे, गोपाळ वाकडे असे 27 शेतकरी या प्रशिक्षणा ला उपस्थित होते. या कार्यक्रमा साठी तांत्रिक सहायक म्हणून श्री. राकेश वाडीले याचे तसेच यलपडवाड व सूर्यवंशी यांचे ही सहकार्य लाभले.








No comments:
Post a Comment