निशिगंधा (गुलछडी /रजनीगंधा/Tuberose) या सुगंधित फुलझाडांच्या कंदाचे वाटप, तसेच सोबत व.ना.म.कृ.वि, परभणी निर्मीत विविध जैविक व जिवाणू खताचे वाटप आदिवासी उप-योजना अंतर्गत मौजे राहटी ता. भोकर जि. नांदेड येथील ५० आदिवासी शेतकऱ्यांना करण्यात आले, रहाटी हे गाव महाराष्ट्र व तेलंगणा या सीमेवर वसलेले असून महाराष्ट्रातील शेवटचे गाव आहे. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख व व.ना.म.कृ.वि,परभणीच्या जिवाणू खत विभाग प्रमुख डॉ. भाग्यरेषा गजभिये व डॉ.वीरभद्र भेदे (किटक शास्त्रज्ञ) सोबतच गावातील शेतकरी बांधवांची उपस्थिती होती यावेळी कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णीचे शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख, व.ना.म.कृ.वि परभणीच्या डॉ. भाग्यरेषा गजबे व डॉ. वीरभद्र भेदे यांनी सद्य परिस्थितीतील शेतकऱ्याच्या समस्यावर भाष्य करत, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी उपस्थिती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

No comments:
Post a Comment