५ डिसेंबर २०२५ रोजी "जागतिक मृदा दिवस" कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णी नांदेड ,महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा मृदसर्वेक्षण व मृद तपासणी अधिकारी नांदेड याचा संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड-1 येथे साजरा केला गेला,यंदा २०२५ साठीची थीम "निरोगी शहरांसाठी निरोगी माती" होती, शहरीकरणाच्या वाढत्या प्रमाणामुळे मातीवर होणाऱ्या प्रभावावर लक्ष केंद्रित करणारा हा दिवस मातीचे महत्त्व आणि तिचे संवर्धन करण्याची आवश्यकता अधोरेखित करतो.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. एस.डी मोरे, संचालक, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी,नांदेड -1 तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मा. दत्तकुमार कळसाईत जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी कृषी विभाग, नांदेड हे उपस्थित होते.
तसेच के. वि. के पोखर्णी चे डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी श्री बालाप्रसाद बंधेल,जि.प. कृषि विकास अधिकारी डॉ. नितेश एतवाडे, जिल्हा मोहीम अधिकारी सचिन कपाळे, ता. कृ.अ.श्री संजय चातरमल व कृ.अ. सौं. पूनम चातरमल तसेच कृषि विभागाचे कृषी अधिकारी,सहाय्यक कृषी अधिकारी व जवळपास 100 शेतकरी उपस्थित होते.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते "आरोग्यदायी जमिनीसाठी माती परीक्षण" या घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉ. अमिता क्षत्रिय ( कृषि विस्तार तज्ञ)यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविका मध्ये डॉ. देविकांत देशमुख ( वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) यांनी मातीचे महत्त्व पटवून देणे, मातीची धूप रोखणे आणि तिच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी प्रोत्साहन देणे.
माती अन्नसुरक्षा, पाण्याची उपलब्धता, ऊर्जा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रे (FAO) आणि इतर संस्थांच्या पुढाकाराने हा दिवस साजरा होतो, ज्याला थायलंडचे दिवंगत राजे भूमिबोल अदुल्यादेज यांनी पाठिंबा दिला होता.
सद्यस्थितीला वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यामुळे मातीच्या आरोग्य आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा असे त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले
त्यानंतर श्री. मा. दत्तकुमार कळसाईत जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी कृषी विभाग, नांदेड यांनी जागतिक मृदा दिवस आपल्याला मातीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रेरित करतो, कारण ती आपल्या जीवनाचा आणि भविष्याचा पाया आहे. त्यामुळे निरोगी मातीच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्याची आणि मृदा स्त्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी समर्थन देण्यासाठी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आव्हान केले.
तसेच कृषि विकास अधिकारी डॉ. निलेश एतवाडे यांनी मातीत सेंद्रिय कर्ब (4%) मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते आणि पिकांचे अवशेष जमिनीत मिसळणे, पीक फेरपालट करणे, रासायनिक खतांचा वापर, बायोचार वापरणे आणि कमी मशागत करणे यांसारख्या पद्धतींचा अवलंब करावा, ज्यामुळे मातीची सुपीकता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि पिकांना अन्नद्रव्ये मिळतात.
यानंतर प्रा. माणिक कल्याणकर (पिक संरक्षण तज्ञ) यांनी मातीतील पोषणद्रव्ये (मॅक्रो व मायक्रो) नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), पोटॅशियम (K), कॅल्शियम (Ca), मॅग्नेशियम (Mg), सल्फर (S) हे मुख्य आणि लोह (Fe), झिंक (Zn), मॅंगनीज (Mn), तांबे (Cu) हे सूक्ष्म पोषक घटक असतात, जे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असून मातीतील सेंद्रिय पदार्थ, हवा, पाणी आणि खनिजांच्या मदतीने वनस्पतींना मिळतात त्यामुळे मातीची काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रा. संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांनी नैसर्गिक,सेंद्रिय व एकात्मिक शेती पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा अशी आव्हान केले.
डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी माती वाचवण्याचे मार्ग, प्रसार व सामाजिक माध्यमांचे शेतीतंत्रज्ञानामध्ये महत्त्व, विविध शेतीविषयक ॲप व सामाजिक माध्यमाचे फायदे व तोटे याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. एस. डी मोरे संचालक, के. वि. के. पोखर्णी यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा वापर करावा व जमिनीतील सुपीकता वाढवावी याबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. महेश आंबोरे ( पशुवैद्यक तज्ञ), यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्राचे कर्मचारी श्री ए.जी भालेराव,श्री आर आर इंगोले,श्री आर.टी. वाडीले,श्री एस. एस. जाधव, सौ पी. एस. हाडोळतिकर, श्री एस.एस. गायकवाड, श्री एस.आर.कोणापुरे,श्री आर.जी.राऊत आणि संतोष वाघमारे यांचे देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष सहकार्य लाभले.















No comments:
Post a Comment