कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी, नांदेड-1 व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी, नांदेड-1 येथे"एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस.डी मोरे, संचालक, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शाहूराज हिरे जिल्हा उपनिबंधक, नांदेड, श्री. शेखर कोंडे-देशमुख,व्यवस्थापक श्री यतीन गुंडेकर, सहाय्यक व्यवस्थापक व श्री.नवनाथ मोरे सहाय्यक,राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे पुणे. या कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख )यांनी केले यात त्यांनी या कार्यशाळेचा उद्देश शेतकऱ्यांना पिकांची काढणी झाल्यानंतरचे योग्य व्यवस्थापन आणि उत्पादनांवर प्रक्रिया करून अधिक नफा मिळावा या बद्दल सांगितले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. शाहूराज हिरे जिल्हा उपनिबंधक, नांदेड, यांनी उत्पादन ते विपणन व ग्राहकच्या गरजे नुसार शेतकऱ्यांनी उत्पादन व संशोधित व पोषण तत्व असलेले वाण वापरले पाहिजे असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले. यानंतर श्री. शेखर कोंडे-देशमुख,व्यवस्थापक राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे पुणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले की सध्या सुगी पश्चात काम चालू आहेत त्यामुळे शेतकरी बंधूनी जास्तीत जास्त बाजार समिती मध्ये यावं व उत्पादित झालेला माल बाजारात चांगल्या भावाने विकला जावा व त्या उत्पादित मालावर प्रक्रिया केली जावी.तसेच यावेळी श्री. नारायण बारसे कृषि उत्पन्न बाजार समिती,नांदेड सी. डी. पाटील कृ. उ. बा. स. धर्माबाद व श्री. मुंगल कृ. उ. बा. स. मुदखेड यांचीही उपस्थिती लाभली.
या प्रशिक्षणामध्ये हळद व सोयाबीन या पिकाविषयी व सुगी पश्चात व्यवस्थापन, अन्न प्रक्रिया, आणि कृषी-आधारित उद्योगांद्वारे स्वयंरोजगार निर्मिती यासारख्या विषयांवर भर देण्यात आला. यावेळी डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख ), प्रा. माणिक कल्याणकर (पिक संरक्षण तज्ञ ) प्रा. संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) डॉ. महेश अंबोरे (पशुवैद्दक तज्ञ )प्रा.सौं अलका पवळे (गृह विज्ञान तज्ञ) व डॉ.अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) कृषि विज्ञान केंद्र,पोखर्णी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हळद व सोयाबीन पिकाच्या विविध विषयावर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. एस. डी मोरे संचालक, के. वि. के. पोखर्णी यांनी सांगितले की आधुनिक शेती व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे. या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये परिसरातील शेतकरी,महिला शेतकरी आणि ग्रामीण तरुणांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉ. अमिता क्षत्रिय, (कृषि विस्तार तज्ञ) के.वि.के पोखर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. महेश अंबोरे यांनी केले.
तसेच कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी चे कर्मचारी श्री ए.जी भालेराव,श्री आर आर इंगोले,श्री एस.एस.जाधव, श्री आर.टी. वाडीले,सौ पी. एस. हाडोळतिकर, श्री एस.एस. गायकवाड, श्री एस.आर.कोणापुरे, श्री.दत्ता कदम श्री आर.जी.राऊत आणि संतोष वाघमारे यांचे सहकार्य लाभले.



No comments:
Post a Comment