शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘विकसित भारत जी-राम जी’ योजनेअंतर्गत १२५ दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेषतः पेरणी व काढणीच्या काळात शेतीमध्ये मजुरांची कमतरता भासते, त्या अनुषंगाने या योजनेत ६० दिवस राखीव ठेवण्यात येणार आहे.
'विकसित भारत जी-राम जी’ योजना कशी लाभदायक आहे,या योजनेची जनमानसात अधिक प्रभावी ओळख निर्माण व्हावी,याची माहिती प्रभावी प्रचार व प्रसार यंत्रणेद्वारे कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णीचे डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख ) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सौं.अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ), डॉ. महेश अंबोरे (पशुवैद्दक तज्ञ) व प्रा.सौं अलका पवळे (गृह विज्ञान तज्ञ) व प्रा. संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांनी नांदेड तालुक्यातील लिबगांव, नाळेश्वर, पिंपरी महिपाळ, पोखर्णी, राहटी, सायाळ, सोमेश्वर, तळणी, वानेगाव, वाघी, वरखेड, भानपुर, वाघी, ढोकी, खडकी, वडवना व मुदखेड तालुक्यातील दरेगाव या गावामधील ग्रामपंचायतीना 'विकसित भारत जी-राम जी’ चे स्टिकर लावून विलेज/किसान गोष्टी,चर्चासत्र व शेतकरी शास्त्रज्ञ संवादा द्वारे शेतकरी व गावकऱ्यांनमध्ये जनजागृती केली. यावेळी विविध गावातील सुमारे २२७ शेतकरी व महिला उपस्थित होते या जनजागृती साठी के.वि.के.चे कर्मचारी श्री. शंकर कोणापुरे आणि संतोष वाघमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




No comments:
Post a Comment