आमचे शेतकरी, आमचा गौरव या सदराखाली " "शेतकऱ्यांच्या यशोगाथा" शेतकरी -शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषी संवाद संपन्न
राष्ट्रीय एकता दिवस
राष्ट्रीय एकता दिवस - कायस्थ शेतकरी उत्पादन कंपनी बामणी तालुका अर्धापूर संचलित "कायस्थ दूध संकलन केंद्र, देगाव बुद्रुक( कारखाना) तालुका .अर्धापूर जिल्हा नांदेड येथे शुभारंभ प्रसंगी प्रगतीशील शेतकरी व दूध उत्पादकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .याप्रसंगी विचार मंचावर उपस्थित राजेंद्र शिंदे जी नायब तहसीलदार, अर्धापूर , श्री दिलीप दमेवार, जिल्हा महाव्यवस्थापक नाबार्ड, डॉ. दिलीप उदगिरे, पशुधन विकास अधिकारी, भगवान तिडके ,सरपंच देगाव ,शाम कदम, संचालक, गजानन तिडके ,संचालक दूध संकलन केंद्र देगाव, सदाशिव कपाटे ,उद्योजक ,सोबतच देगाव व परिसरातील युवक शेतकरी व प्रगतिशील शेतकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी, नांदेड -1 नैसर्गिक व सेंद्रिय शेती प्रशिक्षण संपन्न
पसिदी पेंटा फाउंडेशन CSR -Nestle, RSP (Responsible Sourcing Program ) च्या अंतर्गत लोहा तालुक्यातील पोखरभोसी, धानोरा, पिंपळगांव, धावरी या गावातील शेतकऱ्यांसाठी, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी, नांदेड -1 येथे नेसर्गिक व सेंद्रिय शेती प्रशिक्षण आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) के. वि. के पोखर्णी यांनी केले.
या प्रशिक्षणा मध्ये डॉ. देवीकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी यांनी सेंद्रिय शेती म्हणजे काय व आज सेंद्रिय व नैसर्गिक शेती जर करायची असेल तर शेतकऱ्यांनी संयम ठेवणे व जुना शेतीचा वारसा हा पुढे चालवणे खूप आवश्यक आहे. यानंतर प्रा.संदीप जायभाये यांनी जमिनीची सुपीकता जैवविविधता,नैसर्गिक व सेंद्रिय शेती सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, यानंतर प्रा.माणिक कल्याणकर (पिक संरक्षण तज्ञ) के. वि. के. पोखर्णी यांनी हळद व कापूस पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच कीड व रोग नियंत्रण तंत्र तंत्रज्ञान, सेंद्रिय निविष्ठाचा वापर व योग्य नियोजन, बीज प्रक्रिया, जैविक बुरशीनाशकाचा वापर याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यानंतर डॉ.महेश अंबोरे (पशुवैद्यक तज्ञ) के. वि. के. पोखर्णी यांनी नैसर्गिक शेती मध्ये पशुधनाचे काय महत्व आहे तसेच शेती व पशुधन एकमेकांवर कसे अवलंबून आहेत व शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध विक्री व्यवसाय करणे आवश्यक आहे तसेच लंपी स्किन डिसीज व गोचीड यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन कडुलिंब तेल, करंज तेल व निलगिरी तेल 15 ml आणि 15 ग्रॅम साबुन 1 लिटर पाण्यात मिसळून 6 तासानी ते फवारणी करावे. या सोबतच कडुलिंब पानाची धुरी / धूर सकाळ संध्याकाळ गोठ्यात करावा असे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, यानंतर सौं.अलका पवळे (गृहविज्ञान तज्ञ) के.वि. के पोखर्णी यांनी परसबाग व आवळा,केळी, हळद व डाळ प्रक्रिया उद्योग, शिवणकाम व भरतकम याविषयीची प्रशिक्षण के.वि. के. पोखर्णी येथे आयोजित केले जाते तरी सर्व शेतकरी बंधू व भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान केले. डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ ) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रसार व सामाजिक माध्यम तसेच AI (कृत्रिम बुद्धिमता) विषयी योग्य ज्ञान संपादन करून त्याचा शेतीमध्ये कसा वापर केला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. पसिदी पेंटा फाउंडेशन चे प्रोजेक्ट मॅनेजर अमित येंढे, प्रगतशील शेतकरी मारोती डांगे, परसराम भुजबळ, नितीन ढगे, गोपाळ वाकडे असे 27 शेतकरी या प्रशिक्षणा ला उपस्थित होते. या कार्यक्रमा साठी तांत्रिक सहायक म्हणून श्री. राकेश वाडीले याचे तसेच यलपडवाड व सूर्यवंशी यांचे ही सहकार्य लाभले.
शेतकरी- शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषी संवाद संपन्न - सद्य परिस्थितीत पिकांची घ्यावयाची काळजी व पर्यायी पिके लागवड
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू मा.डॉ. इंद्रामणी सर यांच्या प्रेरणेतून व संचालक, कृषि विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांच्या अधिपत्याखाली व कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड-1 यांच्या च्या समन्वयातून शेतकरी - शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद उपक्रम हा सद्य परिस्थितीत पिकांची घ्यावयाची काळजी व पर्यायी पिके लागवड या विषयावर 69 वा भाग आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) कृ. वि. के पोखर्णी यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र,पोखर्णी, नांदेड-1 चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख ( उद्यानविद्या तज्ञ), यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले त्यांनी प्रस्ताविकात सद्य परिस्थितीतील पिकांची आवस्था व त्यांची घ्यावयाची काळजी यावर भाष्य केले.प्रा. संदीप जायभाये यांनी पर्यायी पीक म्हणून चिया लागवड तंत्रज्ञान याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर प्रा. माणिक कल्याणकर ( पीक संरक्षण तज्ञ) यांनी सद्य परिस्थितीतील पिकांच्या किड, रोग व उपाय यावर मार्गदर्शन केले.डॉ. महेश अंबोरे ( पशुवैद्यक तज्ञ) यांनी पशुधन व त्यांची घ्यावयाची काळजी व सौं. अल्का पवळे ( ग्रह विज्ञान तज्ञ) यांनी चिया वनस्पतीचे महत्व व आरोग्याला होणारे फायदे व चियाचे विविध पदार्थ या बद्दल माहिती दिली डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी चिया -काढणी पच्छात तंत्रज्ञान- विक्री व्यवस्था / बाजारपेठ /पॅकेजिंग व साठवण याबद्दल मार्गदर्शन केले.शेतकरी प्रतिनिधी व कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी च्या संपर्कात असलेले चिया पिकाचे यशस्वी रित्या लागवड करणारे श्री. बालाजी महादावड यांनी चिया पिका बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड करावी असे आवाहन केले. तसेच व. ना. म. कृ. वि. परभणी चे डॉ. प्रशांत देशमुख( मुख्य विस्तार अधिकारी) डॉ. कैलास डाखोरे (विद्यापीठ हवामान शास्त्रज्ञ),यांनी आगामी हवामान स्थिती व त्यानुसार पीक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या ऑनलाईन शेतकरी -शास्त्रज्ञ संवादामध्ये 68 शेतकऱ्यांचा सहभाग होता, व. ना. म. कृ. वी परभणी चे डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी सद्यपरिस्थितील सोयाबीन व तूर पिका बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प (NARP) चे सहयोगी संचालक संशोधन (ADR) डॉ. एस. बी. पवार यांनी कापूस, सोयाबीन, तूर, मका तसेच रब्बी हंगामा तील पीक जसे गहू, हरभरा, ज्वारी व इतर पिका बद्दल माहिती दिली व शेतकऱ्यांनी पिकांची फेरफालट करावी असे आवाहन केले ज्यामुळे जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीत टिकून राहतील. यानंतर व. ना. म. कृ. वी चे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी मेहत्रे यांनी पर्यायी पीक म्हणून चिया पिकांची लागवड करावी असे उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले .प्रा.प्रफुल घंटे डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी ही उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमासाठी डॉ. डी. आर. कांबळे, डॉ. मारुती गरुड या कार्यक्रमासाठी श्री. राकेश वाडीले कृ. वि. के. पोखर्णी यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी केले.
शेतकरी शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषी संवाद संपन्न- रब्बी हंगाम पिक लागवड तंत्र ज्ञान
दिनांक 17ऑक्टोबर, 2025 रोजी,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू मा.डॉ. इंद्रामणी सर यांच्या प्रेरणेतून व संचालक, कृषि विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांच्या अधिपत्याखाली व कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड-1 यांच्या च्या समन्वयातून शेतकरी - शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद उपक्रम हा रब्बी हंगाम पिक लागवड तंत्र ज्ञान या विषयावर 68 वा भाग आयोजित करण्यात आला होता,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) कृ. वि. के पोखर्णी यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र,पोखर्णी, नांदेड-1 चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख ( उद्यानविद्या तज्ञ),यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले व रब्बी पिक लागवडा मध्ये कोण -कोणती पिके घेतली जातात याविषयी सविस्तर माहिती दिली व कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी, नांदेड-1 च्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण,जसे कि कुक्कुटपालन,शेळीपालन, सेंद्रिय निविष्ठा बनवणे,केळीपासून चिप्स बनवणे, आळंबी लागवड इ. चा फायदा शेतकरी बंधू, भागिनी व युवा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.
यानंतर प्रा. माणिक कल्याणकर ( पीक संरक्षण तज्ञ) यांनी हरभरा पिकामध्ये मर रोग व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवांनी चतुसुञी चा अवलंब करावा. ज्यामध्ये मर रोग प्रतिकारक असलेले विद्यापीठाचे संशोधीत वाणाची निवड करावी. एकरी तीन किलो ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीचा जमिनीतून वापर करावा. बियाणास पेरणीपूर्व रासायनिक व जैविक घटकांची बीज प्रक्रिया करावी याविषयी मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले.
डॉ. महेश अंबोरे ( पशुवैद्यक तज्ञ) यांनी पशुधन व त्यांची घ्यावयाची काळजी व सौं. अल्का पवळे ( ग्रह विज्ञान तज्ञ) यांनी पोषण आहार व आरोग्य याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच व. ना. म. कृ. वि. परभणी चे डॉ. प्रशांत देशमुख( मुख्य विस्तार अधिकारी) डॉ. कैलास डाखोरे (विद्यापीठ हवामान शास्त्रज्ञ),यांनी आगामी हवामान स्थिती व त्यानुसार पीक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. व. ना. म. कृ. वि. परभणी च्या ज्वार संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. लक्ष्मण जावळे यांनी ज्वार पिका बद्दल सखोल असे मार्गदर्शन केले व ज्वारीच्या नवीन वाणाची माहिती दिली जसे कि परभणी सुपर दगडी ज्वार एस पी व्ही -2735, त्यानंतर कृषि विद्या तज्ञ डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. डी. आर. कांबळे,डॉ. हनुमान गरुड या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना लाभले.तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबेजोगाई, तुळजापूर येथील कृषि विज्ञान केंद्राचे चे शास्त्रज्ञ यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व या ऑनलाईन शेतकरी -शास्त्रज्ञ संवादामध्ये 99 शेतकऱ्यांचा सहभाग होता, या कार्यक्रमासाठी श्री. राकेश वाडीले कृ. वि. के. पोखर्णी यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी केले.
प्रधानमंत्री धन धान्य कृषि योजना" व डाळवर्गीय पिके आत्मनिर्भरता मिशन
कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी, येथे पी. एम. धनधान्य कृषि योजनेचा शुभारंभ
" प्रधानमंत्री धन धान्य कृषि योजना" व "डाळवर्गीय पिके आत्मनिर्भरता मिशन" या कार्यक्रमाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व लाईव्ह कास्टिंग कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी, नांदेड- १ येथे करण्यात आले त्या निमित्ताने शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय कृषी अनुसंधान परिषद गीताने करण्यात आली असून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व बळीराजा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमासाठी एकूण सहा तालुक्यातील १५०ते १६० शेतकऱ्यांचा सहभाग लाभला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .अमिता क्षत्रिय (कृषी विस्तार तज्ञ) यांनी तर प्रास्ताविक डॉ .देवीकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) यांनी केले. प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचे उद्दिष्ट, हेतू तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि रब्बी पीक पूर्व तयारी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ.एस.डी.मोरे.यांनी भूषविले. प्रा.माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ) यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना रब्बी पिक लागवड पूर्ण तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, बियाण्यांची निवड, बुरशी नियंत्रनाकरीता जैविक निविष्ठांचा वापर करून मशागत करणे याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन त्यावेळी उपस्थितांना केले. त्यानंतर डॉ.महेश आंबोरे (पशुवैद्यक तज्ञ) यांनी जनावरांना होणारे आजार व त्यासाठी जैविक औषधींचा वापर आणि घ्यावयाची काळजी या बाबींवर मार्गदर्शन केले. तसेच सौ.अलका पवळे (गृह विज्ञान तज्ञ) यांनी निर्जंतुकीकरण केलेले पाणी व व्यवस्थित शिजवलेले अन्न तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात जीवनसत्व "क" म्हणजेच आंबट- पिवळ्या व केशरी रंगांच्या फळे व भाजीपाल्याचा आहारात समावेश करावा असे आवाहन केले.
त्यानंतर शेतकरी प्रतिनिधी म्हणून श्री.नारायण वानोळे यांनी शेतकरी प्रश्न आणि समस्या व त्यावर वेळेत सल्ला व मार्गदर्शन यावर आपले मत थोडक्यात व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदरील कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे श्री.राजीव इंगोले,श्री.अशोक भालेराव, श्री. राकेश वाडीले, सौ.प्राजक्ता हाडोळतीकर, श्री.शंकर कोनापुरे, श्री.राहुल राऊत श्री.संतोष वाघमारे तसेच श्री.महेश तहाडे(माहूर आत्मा बी.टी.एम) व श्री.एलपलवाड (मं.कृ.अधिकारी माहूर) यांची देखील विशेष उपस्थिती लाभली.
जागतिक अंडा दिवस साजरा
जागतिक अंडा दिवस कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी तर्फे 10 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय पोखर्णी येथे साजरा करण्यात आला. यावेळी यावेळी डॉ महेश अंबोरे पशु वैद्यक शास्त्रज्ञ् यांनी जागतिक अंडा दिवस साजरा करण्याचा उद्देश व त्याचे आहारातील महत्व सांगितले. तर प्रा. अल्का पवळे गृह विज्ञान तज्ञ् यांनी कच्च अंडी, उकळलेलं अंडी यातील पोषण घटक कोणती व किती असतात तसेच त्याच आहारातील महत्व विषद केले. या प्रसंगी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ् डॉ. देविकांत देशमुख यांनी अंडी सेवन करावे असे आवाहन केले, तर संचालक डॉ. मोरे सर यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच डॉ. अमिता क्षत्रिय कृषि विस्तार तज्ञ यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रा. नांदेडकर मॅडम यांची उपस्तीथी होती तसेच प्रथम वर्षाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाइन कृषि संवाद: रब्बी हंगामाचे नियोजन
दि.१०/१०/२०२५ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या यांच्या प्रेरणेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी (नांदेड-१) यांच्या समन्वयातून “शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाइन कृषि संवाद” या उपक्रमाचा ६७ वा भाग “रब्बी हंगामाची पूर्वतयारी, नियोजन व पिकांची निवड” या विषयावर आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी या संवाद मालिकेचे शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, सध्या जमिनीत मुबलक ओलावा उपलब्ध आहे. या नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करून येणाऱ्या रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, करडई, जवस आदी पिकांची नियोजनबद्ध लागवड करावी. यामुळे खरीपातील नुकसानीची भरपाई होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. रब्बी हंगामात शास्त्रीय पद्धतीने पिकांचे नियोजन करून उत्पादनवाढ साध्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.
मुख्य विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले. हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी हवामान स्थितीचा सविस्तर आढावा घेत, त्यानुसार पीक नियोजन, सिंचन व्यवस्थापन आणि हवामान आधारित सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी (नांदेड-१) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख (उद्यानविद्या तज्ञ) यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील पिक व पाणी परिस्थितीचा सखोल आढावा घेत, रब्बी हंगामातील प्रमुख पिके जसे गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई तसेच कांदा, लसण, बटाटा यांसारख्या भाजीपाला पिकांचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी जिरे, बडीशेप, ओवा, चिया यांसारख्या पर्यायी पिकांच्या लागवडीसाठी जमिनीची योग्य पूर्वतयारी, वाण निवड, पेरणी कालावधी व बाजारपेठेतील संधी याबाबतही उपयुक्त माहिती दिली.
प्रा. माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ) यांनी शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी जमिनीतून प्रसारित होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स हे सेंद्रिय जैवउपचार एकरी ३ किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून वापरण्याचे आवाहन केले. तसेच मर रोगाचा प्रतिकारक्षम असलेल्या विद्यापीठाच्या संशोधित वाणांची निवड करण्याचे सुचवले.
डॉ. महेश अंबोरे (पशुवैद्यक तज्ञ) यांनी रब्बी हंगामातील पशुधनाचे आरोग्य, पोषण व देखभाल यावर मार्गदर्शन केले, तर सौ. अल्का पवळे (गृह विज्ञान तज्ञ) यांनी ग्रामीण कुटुंबांमधील संतुलित पोषण, महिलांचे आरोग्य आणि आहार नियोजन यावर उपयुक्त माहिती दिली.
कार्यक्रमात डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. डी. आर. कांबळे, डॉ. हनुमान गरुड तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबेजोगाई आणि तुळजापूर येथील कृषि विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ यांनीही आपले विचार मांडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ, कृ.वि.के. पोखर्णी) यांनी उत्तमरीत्या पार पाडले.
या संवाद सत्रात एकूण ७३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. राकेश वाडीले (कृ.वि.के. पोखर्णी) यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. या शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद मालिकेच्या माध्यमातून विद्यापीठ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार करून त्यांना आत्मनिर्भर व वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करीत आहे.
शेतकरी-शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद: पूरस्थितीनंतर पिके व पशुधन व्यवस्थापन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी (नांदेड-१) यांच्या समन्वयातून शेतकरी-शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद मालिकेचा ६६ वा भाग “पूरस्थितीनंतर पिके व पशुधनाची घ्यावयाची काळजी व उपाययोजना” या विषयावर दिनांक ३ ऑक्टोबर, २०२५ रोजी यशस्वीपणे पार पडला.
प्रास्ताविक कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी (नांदेड-१) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख (उद्यानविद्या तज्ञ) यांनी केले. या संवादामध्ये विविध विषयांवर मान्यवर शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे डॉ. प्रशांत देशमुख (मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी) आणि डॉ. कैलास डाखोरे (हवामान शास्त्रज्ञ) यांनी आगामी हवामान स्थिती व त्यानुसार पीक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ) यांनी अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या कीड व रोग व्यवस्थापनासाठी उपयुक्त उपाय सुचविले. डॉ. महेश अंबोरे (पशुवैद्यक तज्ञ) यांनी पूरग्रस्त जनावरांच्या आरोग्य व पोषण व्यवस्थापनाविषयी, प्रा. संदीप जायेभाये (कृषिविद्या तज्ञ) यांनी पूरानंतर मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन आणि रब्बी हंगाम नियोजन यावर मार्गदर्शन केले तर डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत विविध शासकीय योजनांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. तसेच सौ. अल्का पवळे (गृह विज्ञान तज्ञ) यांनी ग्रामीण महिलांच्या सहभागाद्वारे घरगुती स्तरावर पूरनंतरचे व्यवस्थापन कसे करता येईल, यावर विशेष भर दिला.
या ऑनलाईन संवादामध्ये एकूण ६५ शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांनी संवादादरम्यान विविध प्रश्न उपस्थित करून शास्त्रज्ञांकडून तात्काळ सल्ला मिळविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. अमिता क्षत्रिय यांनी केले.
मशरूम उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न
कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथे मशरूम उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न
दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड येथे मशरूम उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, कृषी विज्ञान केंद्र चे डॉ.देवीकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) यांनी मशरूम उत्पादनाचे उपस्थित शेतकऱ्यांना महत्त्व सांगितले, तसेच प्रा. माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ) यांनी धिंगरी अळंबी लागवड तंत्रज्ञाना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी सौं.अलका पवळे (गृह विज्ञान तज्ञ ) यांनी मशरूमचे आहारातील महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले तसेच डॉ. सौं. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ)यांनी सामाजिक माध्यमाचा वापर करुन आळंबीचे विक्री व्यवस्थापन कसे करावे याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच डॉ. महेश अंबोरे (पशुवैद्यक तज्ञ ) व प्रा. संदीप जायेभाये (कृषि विद्या तज्ञ) यांची या प्रशिक्षणाला उपस्थिती होती हे प्रशिक्षण 8 शेतकऱ्यांना देण्यात आले.

























