
२३ डिसेंबर हा दिवस कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी येथे, "राष्ट्रीय किसान (सम्मान )दिवस" म्हणून साजरा केला गेला. देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांची कठोर मेहनत,संघर्ष व समर्पणाची आठवण करुन देणारा हा दिवस आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भारतीय कृषि अनुसंधान संस्थेत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरातील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या सर्व संस्था, कृषि विद्यापीठे तसेच कृषि विज्ञान केंद्रांमध्ये करण्यात आले.
या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी,नांदेड -१ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस.डी मोरे, संचालक, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी,नांदेड -१ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवाजी शिंदे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य तसेच डॉ. दशरथ सारंग सहा. प्रा. कृषी महाविद्यालय गोळेगाव तसेच के.वि.के पोखर्णी चे डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) व इतर शास्त्रज्ञ, कर्मचारी व नांदेड जिल्हयातील प्रगतशील शेतकरी यांची उपस्थिती होती.
डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) यांनी राष्ट्रीय किसान दिवसाचे महत्व अधोरेखित करत या कार्यक्रमाचे सविस्तर व अभ्यासपूर्ण प्रास्ताविक सादर केले त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘विकसित भारत जी-राम जी’ योजनेअंतर्गत १२५ दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेषतः पेरणी व काढणीच्या काळात शेतीमध्ये मजुरांची कमतरता भासते, त्या अनुषंगाने या योजनेत ६० दिवस राखीव ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
डॉ. शिवाजी शिंदे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य कृषी महाविद्यालय गोळेगाव,यांनी शेतकऱ्यांनी विकेल ते पिकेल यावर आधारित शेती करणे गरजेचे आहे बाजारात ज्याची गरज आहे ते जर पिकवले व वैविधपूर्ण (diversification) पिकांची लागवड केली तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. यानंतर डॉ. दशरथ सारंग सहा.प्रा.कृषी महाविद्यालय गोळेगाव यांनी कमी निविष्ठामध्ये मध्ये जास्त उत्पन्न व कमी किंमतीचे जैविक निविष्ठा व रासायनिक खतांचा वापर करावा असा सल्ला यावेळी शेतकऱ्यांना दिला.
कृषि विज्ञान केंद्र,पोखर्णी चे प्रा. माणिक कल्याणकर (पिक संरक्षण तज्ञ) सेंद्रिय व नैसर्गिक शेती या विषयावर मार्गदर्शन करताना रासायनिक खतांवरील अवलंबन कमी करून जमिनीची सुपीकता, जपण्यासाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर कसा उपयुक्त आहे या वर माहिती दिली.
यानंतर प्रा. संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ)यांनी एकात्मिक शेती पद्धती, आंतरपीक पद्धती तसेच नैसर्गिक शेती पद्धतींना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉ. सौं. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ)यांनी केले व विकसित भारत जी-राम जी’ योजना कशी लाभदायक आहे,या योजनेची जनमानसात अधिक प्रभावी ओळख निर्माण व्हावी,याची माहिती प्रभावी प्रचार व प्रसार यंत्रणेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल असे आवाहन केले.अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. एस. डी मोरे संचालक, के. वि. के. पोखर्णी यांनी सांगितले की, २०४७ मध्ये विकसित भारत घडवताना शेतकऱ्यांचे कल्याण अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांचे कल्याण झाले तरच शेतीचे कल्याण होऊ शकते.
यानंतर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ.महेश अंबोरे ( पशुवैद्दक तज्ञ) यांनीकेले व सौं अलका पवळे ( गृह विज्ञान तज्ञ) यांचे या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती व सहकार्य लाभले. यावेळी श्री.मधुकर पावडे,श्री.अमोल सावंत,श्री. ज्ञानेश्वर डाखोरे, श्री.विजय भारसावडे व अथर्व पवार या पुरस्कारप्राप्त व प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी २२३ प्रगतशील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.
तसेच कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी चे कर्मचारी श्री ए.जी भालेराव,श्री आर आर इंगोले,श्री एस.एस.जाधव, श्री आर.टी. वाडीले,सौ पी. एस. हाडोळतिकर, श्री एस.एस. गायकवाड, श्री एस.आर.कोणापुरे, श्री.दत्ता कदम श्री आर.जी.राऊत आणि संतोष वाघमारे यांचे सहकार्य लाभले.