निशिगंधा (गुलछडी /रजनीगंधा/Tuberose)या सुगंधित फुलझाडांच्या कंदाचे व वर्मीबेडचे वाटप उपस्थित हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बहुल वाळक्याची वाडी या गावातील शेतकऱ्यांना केले.
याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख , (प्रमुख शास्त्रज्ञ व प्रमुख) प्रा. माणिक कल्याणकर ( पीक संरक्षण तज्ञ) व डॉ. सौं. अमिता क्षत्रिय ( कृषि विस्तार तज्ञ) व गावच्या सरपंच उपस्थित होत्या.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णीचे शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख,सद्य परिस्थितीतील शेतकऱ्याच्या समस्यावर भाष्य केले तसेच कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णीच्या विविध उपक्रमाविषयी सखोल अशी माहिती व कृ.वि.के आयोजित प्रशिक्षणा मध्ये सहभागी होण्याचे आव्हान उपस्थित शेतकऱ्यांना केले.प्रा. माणिक कल्याणकर ( पीक संरक्षण तज्ञ) यांनी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी तांत्रिक माहिती उपस्थिती शेतकऱ्यांना दिली.व डॉ.अमिता क्षत्रिय यांनी आदिवासी उप-योजना व कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी च्या सामाजिक माध्यमाच्या प्लॅटफॉर्मबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.या प्रसंगी ता. कृ. अ. शिवाजीराव मिरासे व मं. कृ. अ. वानखेडे, गावच्या सरपंच आणि ६५ शेतकरी उपस्थित होते.




No comments:
Post a Comment