🌸 महिला सक्षमीकरणातून आधुनिक शेतीकडे वाटचाल
📍 मौजे खैरगाव, शहापूर, तसेच पांगरी ता. अर्धापूर, जि. नांदेड.
“ग्रामीण भागातील महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत,
कृषी विज्ञान केंद्र, पोखरणी नांदेड तर्फे मौजे. खैरगाव, शहापूर व पांगरी येथे महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.” या कार्यक्रमात हळद लागवड व काढणी यंत्रासह कष्ट कमी करणाऱ्या आधुनिक अवजारांची माहिती देण्यात आली. दाताळे, उकरी, सावडी, नखाळ्या आणि सुलभा बॅग यांसारख्या साधनांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. चिकू काढणी यंत्राबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून महिलांना सुलभ व सुरक्षित काढणी तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.. देवीकांत देशमुख, गृह विज्ञान तज्ञ सौ. अलका पवळे, तसेच कृषी विस्तार तज्ञ डॉ. अमिता क्षत्रिय यांची उपस्थिती लाभली. प्रथम दर्शनी पीक प्रात्यक्षिक अंतर्गत सेंद्रिय पोषण बागेचा आढावा घेण्यात आला. तसेच परभणी आणि राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कष्ट कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. उपस्थित सर्व महिला भगिनींना निशिगंध या सुवासिक फुलपिकाच्या ‘अर्का प्रज्वल’ या जातीचे कंद लागवडीसाठी वाटप करण्यात आले. “महिलांच्या हातात तंत्रज्ञानाची ताकद दिल्यास शेती अधिक सक्षम, सशक्त आणि समृद्ध होते.” हा प्रेरणादायी संवाद व वाटप कार्यक्रम मौजे खैरगाव, पांगरी, शहापूर तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथे यशस्वीपणे पार पडला.
“समृद्ध महिला… समृद्ध शेती… समृद्ध भारत.”

No comments:
Post a Comment