प्रशिक्षण कार्यक्रम- महिला सक्षमीकरणातून आधुनिक शेतीकडे वाटचाल

 

🌸 महिला सक्षमीकरणातून आधुनिक शेतीकडे वाटचाल

📍 मौजे खैरगाव, शहापूर, तसेच पांगरी ता. अर्धापूर, जि. नांदेड.

“ग्रामीण भागातील महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत,

    कृषी विज्ञान केंद्र, पोखरणी नांदेड तर्फे मौजे. खैरगाव, शहापूर व पांगरी  येथे महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.” या कार्यक्रमात हळद लागवड व काढणी यंत्रासह कष्ट कमी करणाऱ्या आधुनिक अवजारांची माहिती देण्यात आली. दाताळे, उकरी, सावडी, नखाळ्या आणि सुलभा बॅग यांसारख्या साधनांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. चिकू काढणी यंत्राबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून महिलांना सुलभ व सुरक्षित काढणी तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.. देवीकांत देशमुख, गृह विज्ञान तज्ञ सौ. अलका पवळे, तसेच कृषी विस्तार तज्ञ डॉ. अमिता क्षत्रिय यांची उपस्थिती लाभली. प्रथम दर्शनी पीक प्रात्यक्षिक अंतर्गत सेंद्रिय पोषण बागेचा आढावा घेण्यात आला. तसेच परभणी आणि राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कष्ट कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. उपस्थित सर्व महिला भगिनींना निशिगंध या सुवासिक फुलपिकाच्या ‘अर्का प्रज्वल’ या जातीचे कंद लागवडीसाठी वाटप करण्यात आले. “महिलांच्या हातात तंत्रज्ञानाची ताकद दिल्यास शेती अधिक सक्षम, सशक्त आणि समृद्ध होते.” हा प्रेरणादायी संवाद व वाटप कार्यक्रम मौजे खैरगाव, पांगरी, शहापूर तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथे यशस्वीपणे पार पडला.

“समृद्ध महिला… समृद्ध शेती… समृद्ध भारत.”



शेळीपालन प्रशिक्षण - १६ ते १८ फेब्रुवारी २०२६ कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड-१

कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी नांदेड तर्फे तीन दिवशीय शेळीपालन प्रशिक्षण दि. 16 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहे तरी इच्छुक पशुपालक, शेतकरी यांनी आपले नाव खालील गूगल फॉर्म भरून नोंदणी करावी. 


संपर्क: डॉ. महेश अंबोरे- 9423140163

आदिवासी उप-योजना (TSP) मार्फत कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी तर्फे कृषि निविष्ठाचे वाटप

 

     निशिगंधा (गुलछडी /रजनीगंधा/Tuberose)या सुगंधित फुलझाडांच्या कंदाचे व वर्मीबेडचे वाटप उपस्थित हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बहुल वाळक्याची वाडी या गावातील शेतकऱ्यांना केले.  

याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख , (प्रमुख शास्त्रज्ञ व प्रमुख) प्रा. माणिक कल्याणकर ( पीक संरक्षण तज्ञ) व डॉ. सौं. अमिता क्षत्रिय ( कृषि विस्तार तज्ञ)  व गावच्या सरपंच  उपस्थित होत्या.

 यावेळी कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णीचे शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख,सद्य परिस्थितीतील शेतकऱ्याच्या समस्यावर भाष्य केले तसेच कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णीच्या विविध उपक्रमाविषयी सखोल अशी माहिती व कृ.वि.के आयोजित प्रशिक्षणा मध्ये सहभागी होण्याचे आव्हान उपस्थित शेतकऱ्यांना केले.प्रा. माणिक कल्याणकर ( पीक संरक्षण तज्ञ) यांनी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी तांत्रिक माहिती उपस्थिती शेतकऱ्यांना दिली.व डॉ.अमिता क्षत्रिय यांनी आदिवासी उप-योजना व कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी च्या सामाजिक माध्यमाच्या प्लॅटफॉर्मबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.या प्रसंगी ता. कृ. अ. शिवाजीराव मिरासे व मं. कृ. अ. वानखेडे, गावच्या सरपंच आणि ६५ शेतकरी उपस्थित होते.








कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णीच्या, मार्फत जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, तळणी येथील सेंद्रिय परसबाग पाहणी (FLD-Kitchen garden)

 

        जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, तळणी शाळेमध्ये राबवण्यात येत असलेला "मुख्यमंत्री -माझी सुंदर शाळा" या उपक्रमांतर्गत सेंद्रिय परसबाग कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णीच्या, मार्गदर्शनाखाली आद्यरेषिय प्रात्यक्षिक (FLD) च्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे. या सेंद्रियपरसबागेचे follow up(पाहणी) व मार्गदर्शन कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णीचे डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख ), प्रा.सौं अलका पवळे (गृह विज्ञान तज्ञ) व डॉ.अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांच्याद्वारे करण्यात आले. यावेळी जि.प.प्रा.शा. तळणीचे मुख्याध्यापक श्री. गोविंद घोडके, व शिक्षक/शिक्षिका श्री. ढवळे, सौं. जोड, श्री. बडुरे, सौं. साखरे, कु. ढगे सौं. मोरलवार व मदतनीस अनुसया सूर्यवंशी हे उपस्थित होते. शाळेतील परसबागेतील सर्व भाजीपाला शाळा पोषण आहारामध्ये उपयोग केला जातो, तसेच कार्यानुभव या विषयामध्ये श्रमदानामुळे विद्यार्थ्यामध्ये ज्ञानाचे धडे देखील दिले जातात. कृ.वि.के च्या माध्यमातुन वेळोवेळी मार्गदर्शन,भाजीपाला बियाणे, जैविक निविष्ठा यांचा वेळोवेळी पुरवठा केला जातो. वापरल्या जाणाऱ्या जैविक निविष्ठांची माहिती, किटक व रोग नाशक औषधी याबद्‌दल वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विस्तार तज्ञ आणि गृह विज्ञान तज्ञ यांनी पुर्णपणे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना सहलीच्या माध्यमातुन कृषि विज्ञान केंद्राला भेट देऊन विविध उपक्रमांचा आढावा घ्यावा जेणे करून विद्यार्थ्यांना कृ.वि.कें ची ओळख, कार्य, उदिष्ट, नैसर्गिक व जैविक शेती याबद्दल सखोल माहिती होईल असे आवाहन कृ.वि.कें चे (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) देविकांत देशमुख यांनी केले. सर्व मुख्याध्यापक शिक्षक - शिक्षिका, मदत निस सर्वांनी चांगली मेहनत घेऊन परसबाग फुलवली त्याबददल त्यांचे के.वि.के.पोखर्णी कढून आभार मान्यात आले. यावेळी के.वि.के.चे कर्मचारी श्री. सुदाम गायकवाड आणि संतोष वाघमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





' कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी मार्फत विकसित भारत जी-राम जी’ (VB-GRAMIN) योजनेची जनजागृती.

     शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘विकसित भारत जी-राम जी’ योजनेअंतर्गत १२५ दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेषतः पेरणी व काढणीच्या काळात शेतीमध्ये मजुरांची कमतरता भासते, त्या अनुषंगाने या योजनेत ६० दिवस राखीव ठेवण्यात येणार आहे.

'विकसित भारत जी-राम जी’ योजना कशी लाभदायक आहे,या योजनेची जनमानसात अधिक प्रभावी ओळख निर्माण व्हावी,याची माहिती प्रभावी प्रचार व प्रसार यंत्रणेद्वारे कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णीचे डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख ) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सौं.अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ), डॉ. महेश अंबोरे (पशुवैद्दक तज्ञ) व प्रा.सौं अलका पवळे (गृह विज्ञान तज्ञ) व प्रा. संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांनी नांदेड तालुक्यातील लिबगांव, नाळेश्वर, पिंपरी महिपाळ, पोखर्णी, राहटी, सायाळ, सोमेश्वर, तळणी, वानेगाव, वाघी, वरखेड, भानपुर, वाघी, ढोकी, खडकी, वडवना व मुदखेड तालुक्यातील दरेगाव या गावामधील ग्रामपंचायतीना  'विकसित भारत जी-राम जी’ चे स्टिकर लावून विलेज/किसान गोष्टी,चर्चासत्र व शेतकरी शास्त्रज्ञ संवादा द्वारे शेतकरी व गावकऱ्यांनमध्ये जनजागृती केली. यावेळी विविध गावातील सुमारे २२७ शेतकरी व महिला उपस्थित होते या जनजागृती साठी के.वि.के.चे कर्मचारी श्री. शंकर कोणापुरे आणि संतोष वाघमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.