कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी तर्फे आदिवासी उप-योजना (TSP) अंतर्गत कृषि निविष्ठाचे वाटप

 

     निशिगंधा (गुलछडी /रजनीगंधा/Tuberose) या सुगंधित फुलझाडांच्या कंदाचे वाटप, तसेच सोबत  व.ना.म.कृ.वि, परभणी निर्मीत विविध जैविक व जिवाणू खताचे वाटप आदिवासी उप-योजना अंतर्गत मौजे राहटी ता. भोकर जि. नांदेड येथील ५० आदिवासी शेतकऱ्यांना करण्यात आले, रहाटी हे गाव महाराष्ट्र व तेलंगणा या सीमेवर वसलेले असून महाराष्ट्रातील शेवटचे गाव आहे. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख व  व.ना.म.कृ.वि,परभणीच्या जिवाणू खत विभाग प्रमुख डॉ. भाग्यरेषा गजभिये व डॉ.वीरभद्र भेदे (किटक शास्त्रज्ञ) सोबतच गावातील शेतकरी बांधवांची उपस्थिती होती यावेळी कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णीचे शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख,  व.ना.म.कृ.वि परभणीच्या डॉ. भाग्यरेषा गजबे व डॉ. वीरभद्र भेदे यांनी सद्य परिस्थितीतील शेतकऱ्याच्या समस्यावर भाष्य करत, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी उपस्थिती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.




राष्ट्रीय किसान (सम्मान )दिवस "२३ डिसेंबर" : शेती क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान."

 

            २३ डिसेंबर हा दिवस कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी येथे, "राष्ट्रीय किसान (सम्मान )दिवस" म्हणून साजरा केला गेला. देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांची कठोर मेहनत,संघर्ष व समर्पणाची आठवण करुन देणारा हा दिवस आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भारतीय कृषि अनुसंधान संस्थेत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरातील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या सर्व संस्था, कृषि विद्यापीठे तसेच कृषि विज्ञान केंद्रांमध्ये करण्यात आले.

    या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी,नांदेड -१ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस.डी मोरे, संचालक, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी,नांदेड -१ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवाजी शिंदे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य तसेच डॉ. दशरथ सारंग सहा. प्रा. कृषी महाविद्यालय गोळेगाव तसेच के.वि.के पोखर्णी चे डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) व  इतर शास्त्रज्ञ, कर्मचारी व नांदेड जिल्हयातील प्रगतशील शेतकरी यांची उपस्थिती होती.

डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) यांनी राष्ट्रीय किसान दिवसाचे महत्व अधोरेखित करत या कार्यक्रमाचे सविस्तर व अभ्यासपूर्ण प्रास्ताविक सादर केले त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘विकसित भारत जी-राम जी’ योजनेअंतर्गत १२५ दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेषतः पेरणी व काढणीच्या काळात शेतीमध्ये मजुरांची कमतरता भासते, त्या अनुषंगाने या योजनेत ६० दिवस राखीव ठेवण्यात आल्याची माहिती दिली.

    डॉ. शिवाजी शिंदे सहयोगी अधिष्ठाता  व प्राचार्य कृषी महाविद्यालय गोळेगाव,यांनी शेतकऱ्यांनी विकेल ते पिकेल यावर आधारित शेती करणे गरजेचे आहे बाजारात ज्याची गरज आहे ते जर पिकवले व वैविधपूर्ण (diversification) पिकांची लागवड केली तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. यानंतर डॉ. दशरथ सारंग सहा.प्रा.कृषी महाविद्यालय गोळेगाव यांनी कमी निविष्ठामध्ये मध्ये जास्त उत्पन्न व कमी किंमतीचे जैविक निविष्ठा व रासायनिक खतांचा वापर करावा असा सल्ला यावेळी शेतकऱ्यांना दिला.

    कृषि विज्ञान केंद्र,पोखर्णी चे प्रा. माणिक कल्याणकर (पिक संरक्षण तज्ञ) सेंद्रिय व नैसर्गिक शेती या विषयावर मार्गदर्शन करताना रासायनिक खतांवरील अवलंबन कमी करून जमिनीची सुपीकता, जपण्यासाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर कसा उपयुक्त आहे या वर माहिती दिली.

    यानंतर प्रा. संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ)यांनी एकात्मिक शेती पद्धती, आंतरपीक पद्धती तसेच नैसर्गिक शेती पद्धतींना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन व नियोजन डॉ. सौं. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ)यांनी केले व विकसित भारत जी-राम जी’ योजना कशी लाभदायक आहे,या योजनेची जनमानसात अधिक प्रभावी ओळख निर्माण व्हावी,याची माहिती प्रभावी प्रचार व प्रसार यंत्रणेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल असे आवाहन केले.अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. एस. डी मोरे संचालक, के. वि. के. पोखर्णी यांनी सांगितले की, २०४७ मध्ये विकसित भारत घडवताना शेतकऱ्यांचे कल्याण अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांचे कल्याण झाले तरच शेतीचे कल्याण होऊ शकते.

    यानंतर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ.महेश अंबोरे ( पशुवैद्दक तज्ञ) यांनीकेले व सौं अलका पवळे ( गृह विज्ञान तज्ञ) यांचे या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती व सहकार्य लाभले. यावेळी श्री.मधुकर पावडे,श्री.अमोल सावंत,श्री. ज्ञानेश्वर डाखोरे, श्री.विजय भारसावडे व अथर्व पवार या पुरस्कारप्राप्त व प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी २२३ प्रगतशील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

तसेच कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी चे कर्मचारी श्री ए.जी भालेराव,श्री आर आर इंगोले,श्री एस.एस.जाधव, श्री आर.टी. वाडीले,सौ पी. एस. हाडोळतिकर, श्री एस.एस. गायकवाड, श्री एस.आर.कोणापुरे, श्री.दत्ता कदम श्री आर.जी.राऊत आणि संतोष वाघमारे यांचे  सहकार्य लाभले.





हळद व सोयाबीन सुगी पश्चात तंत्रज्ञान: एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन


        कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी, नांदेड-1 व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी, नांदेड-1  येथे"एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस.डी मोरे, संचालक, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शाहूराज हिरे जिल्हा उपनिबंधक, नांदेड, श्री. शेखर कोंडे-देशमुख,व्यवस्थापक श्री यतीन गुंडेकर, सहाय्यक व्यवस्थापक व श्री.नवनाथ मोरे सहाय्यक,राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे पुणे. या कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख )यांनी केले यात त्यांनी या कार्यशाळेचा उद्देश शेतकऱ्यांना पिकांची काढणी झाल्यानंतरचे योग्य व्यवस्थापन आणि उत्पादनांवर प्रक्रिया करून अधिक नफा मिळावा या बद्दल सांगितले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. शाहूराज हिरे जिल्हा उपनिबंधक, नांदेड, यांनी उत्पादन ते विपणन व ग्राहकच्या गरजे नुसार शेतकऱ्यांनी उत्पादन व संशोधित व पोषण तत्व असलेले वाण वापरले पाहिजे असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले. यानंतर श्री. शेखर कोंडे-देशमुख,व्यवस्थापक राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे पुणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले की सध्या सुगी पश्चात काम चालू आहेत त्यामुळे शेतकरी बंधूनी जास्तीत जास्त बाजार समिती मध्ये यावं व उत्पादित झालेला माल बाजारात चांगल्या भावाने विकला जावा व त्या उत्पादित मालावर प्रक्रिया केली जावी.तसेच यावेळी श्री. नारायण बारसे कृषि उत्पन्न बाजार समिती,नांदेड सी. डी. पाटील कृ. उ. बा. स. धर्माबाद व श्री. मुंगल कृ. उ. बा. स. मुदखेड यांचीही उपस्थिती लाभली.

   या प्रशिक्षणामध्ये हळद व सोयाबीन या पिकाविषयी व सुगी पश्चात व्यवस्थापन, अन्न प्रक्रिया, आणि कृषी-आधारित उद्योगांद्वारे स्वयंरोजगार निर्मिती यासारख्या विषयांवर भर देण्यात आला. यावेळी  डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख ), प्रा. माणिक कल्याणकर (पिक संरक्षण तज्ञ ) प्रा. संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) डॉ. महेश अंबोरे (पशुवैद्दक तज्ञ )प्रा.सौं अलका पवळे (गृह विज्ञान तज्ञ) व डॉ.अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) कृषि विज्ञान केंद्र,पोखर्णी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हळद व सोयाबीन पिकाच्या विविध विषयावर मार्गदर्शन केले.

    अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. एस. डी मोरे संचालक, के. वि. के. पोखर्णी यांनी सांगितले की आधुनिक शेती व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे. या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये परिसरातील शेतकरी,महिला शेतकरी आणि ग्रामीण तरुणांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉ. अमिता क्षत्रिय, (कृषि विस्तार तज्ञ) के.वि.के पोखर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. महेश अंबोरे यांनी केले.

तसेच कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी चे कर्मचारी श्री ए.जी भालेराव,श्री आर आर इंगोले,श्री एस.एस.जाधव, श्री आर.टी. वाडीले,सौ पी. एस. हाडोळतिकर, श्री एस.एस. गायकवाड, श्री एस.आर.कोणापुरे, श्री.दत्ता कदम श्री आर.जी.राऊत आणि संतोष वाघमारे यांचे  सहकार्य लाभले.

कृषि प्रदर्शन: माळेगाव यात्रा २०२५

 


"माळेगाव यात्रा २०२५: कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीच्या स्टॉलला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद."

        दक्षिण भारतातील प्रसिद्ध व प्राचीन असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील कृषी प्रदर्शनात दिनांक १८ ते २२ डिसेंबर २०२५ दरम्यान सहभागी झालेल्या कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड-१ च्या स्टॉलचे मान्यवराच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तसेच उपस्थित शेतकरी बांधवांना सविस्तर असे मार्गदर्शन शेतकरी -शास्त्रज्ञ संवाद अंतर्गत करण्यात आले.

         महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय श्री बाबासाहेब पाटील व लोहा कंधार चे आमदार, श्रीमान प्रतापराव पाटील चिखलीकर , जिल्हाधिकरी नांदेड, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रणिता ताई देवरे चिखलीकर , आकाशवाणी केंद्र नांदेड, लोकप्रतिनिधी, शेतकरी बांधव व महिला भगिनी, पत्रकार व व्यापारी बांधव, तरुण शेतकरी, गृहिणी, कृषी अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक व वरिष्ठ नागरिकांनी  कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडच्या स्टॉलला भेट देऊन कृषी विज्ञान केंद्र राबवीत असलेल्या विविध कृषी विस्तार कार्यक्रम, प्रशिक्षणे उपक्रम, योजनेची सविस्तर माहिती घेतली व स्टॉलवर उपस्थित असलेल्या कृषि विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख ( उद्यान विद्या) प्रा.माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ )डॉ. महेश अंबोरे ( पशु वैद्यक तज्ञ) प्रा. संदीप जायभाये ( कृषि विद्या तज्ञ) प्रा. सौं.अलका पवळे (गृह विज्ञान तज्ञ) व डॉ. सौं.अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) या सर्व शास्त्रज्ञाकडून विविध शंकेचे निरसन करून घेतले, यावेळी भेट दिलेल्या प्रत्येकांना कृषी विज्ञान केंद्राच्या विविध कृषी निविष्ठा निर्मिती विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी श्री ए.जी भालेराव,श्री आर आर इंगोले,श्री आर.टी. वाडीले,श्री एस. एस. जाधव, सौ पी. एस. हाडोळतिकर, श्री एस.एस. गायकवाड, श्री एस.आर.कोणापुरे,श्री आर.जी.राऊत आणि संतोष वाघमारे यांचे देखील विशेष सहकार्य लाभले.

         लोहा तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या तळ्याची वाडी येथील २०० महिला बचत गट सदस्यांनी स्टॉलला भेट देऊन कृषी विज्ञान केंद्राकडून शेती व शेती पूरक जोडधंद्यावर प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शवली.





















जागतिक मृदा दिन : "निरोगी शहरांसाठी निरोगी माती: जागतिक मृदा दिनानिमित्त मातीच्या आरोग्याची गरज अधोरेखित"

 

    ५ डिसेंबर २०२५ रोजी "जागतिक मृदा दिवस" कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णी नांदेड ,महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा मृदसर्वेक्षण व मृद तपासणी अधिकारी नांदेड याचा संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड-1 येथे  साजरा केला गेला,यंदा २०२५ साठीची थीम "निरोगी शहरांसाठी निरोगी माती" होती, शहरीकरणाच्या वाढत्या प्रमाणामुळे मातीवर होणाऱ्या प्रभावावर लक्ष केंद्रित करणारा हा दिवस मातीचे महत्त्व आणि तिचे संवर्धन करण्याची आवश्यकता अधोरेखित करतो. 

     या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. एस.डी मोरे, संचालक, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी,नांदेड -1 तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मा. दत्तकुमार कळसाईत जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी कृषी विभाग, नांदेड हे उपस्थित होते.

    तसेच के. वि. के पोखर्णी चे डॉ. देविकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी श्री बालाप्रसाद बंधेल,जि.प. कृषि विकास अधिकारी डॉ. नितेश एतवाडे, जिल्हा मोहीम अधिकारी सचिन कपाळे, ता. कृ.अ.श्री संजय चातरमल व कृ.अ. सौं. पूनम चातरमल तसेच कृषि विभागाचे कृषी अधिकारी,सहाय्यक कृषी अधिकारी  व जवळपास 100 शेतकरी  उपस्थित होते.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते  "आरोग्यदायी जमिनीसाठी माती परीक्षण" या घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.

    कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन व नियोजन डॉ. अमिता क्षत्रिय ( कृषि विस्तार तज्ञ)यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविका मध्ये डॉ. देविकांत देशमुख (  वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) यांनी मातीचे महत्त्व पटवून देणे, मातीची धूप रोखणे आणि तिच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी प्रोत्साहन देणे.

    माती अन्नसुरक्षा, पाण्याची उपलब्धता, ऊर्जा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रे (FAO) आणि इतर संस्थांच्या पुढाकाराने हा दिवस साजरा होतो, ज्याला थायलंडचे दिवंगत राजे भूमिबोल अदुल्यादेज यांनी पाठिंबा दिला होता.

    सद्यस्थितीला वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यामुळे मातीच्या आरोग्य आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा असे त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले

    त्यानंतर श्री. मा. दत्तकुमार कळसाईत जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी कृषी विभाग, नांदेड यांनी जागतिक मृदा दिवस आपल्याला मातीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रेरित करतो, कारण ती आपल्या जीवनाचा आणि भविष्याचा पाया आहे. त्यामुळे निरोगी मातीच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्याची आणि मृदा स्त्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी समर्थन देण्यासाठी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आव्हान केले.

        तसेच कृषि विकास अधिकारी डॉ. निलेश एतवाडे यांनी मातीत सेंद्रिय कर्ब (4%) मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते आणि पिकांचे अवशेष जमिनीत मिसळणे, पीक फेरपालट करणे, रासायनिक खतांचा वापर, बायोचार वापरणे आणि कमी मशागत करणे यांसारख्या पद्धतींचा अवलंब करावा, ज्यामुळे मातीची सुपीकता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि पिकांना अन्नद्रव्ये मिळतात. 

    यानंतर  प्रा. माणिक कल्याणकर (पिक संरक्षण तज्ञ) यांनी मातीतील पोषणद्रव्ये (मॅक्रो व मायक्रो) नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), पोटॅशियम (K), कॅल्शियम (Ca), मॅग्नेशियम (Mg), सल्फर (S) हे मुख्य आणि लोह (Fe), झिंक (Zn), मॅंगनीज (Mn), तांबे (Cu) हे सूक्ष्म पोषक घटक असतात, जे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असून मातीतील सेंद्रिय पदार्थ, हवा, पाणी आणि खनिजांच्या मदतीने वनस्पतींना मिळतात त्यामुळे मातीची काळजी घेणे आवश्यक आहे.

    प्रा. संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांनी नैसर्गिक,सेंद्रिय व  एकात्मिक शेती पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा अशी आव्हान केले. 

    डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी माती वाचवण्याचे मार्ग, प्रसार व सामाजिक माध्यमांचे शेतीतंत्रज्ञानामध्ये महत्त्व, विविध शेतीविषयक ॲप व सामाजिक माध्यमाचे फायदे व तोटे याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. एस. डी मोरे संचालक, के. वि. के. पोखर्णी यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा वापर करावा व जमिनीतील सुपीकता वाढवावी याबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. महेश आंबोरे ( पशुवैद्यक तज्ञ), यांनी केले.

    कृषि विज्ञान केंद्राचे कर्मचारी श्री ए.जी भालेराव,श्री आर आर इंगोले,श्री आर.टी. वाडीले,श्री एस. एस. जाधव, सौ पी. एस. हाडोळतिकर, श्री एस.एस. गायकवाड, श्री एस.आर.कोणापुरे,श्री आर.जी.राऊत आणि संतोष वाघमारे यांचे देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष सहकार्य लाभले.